How to Download Instagram Dp Marathi | इंस्टाग्राम वरून DP कसा डाऊनलोड करावा?

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मराठीमुलगा.कॉम वरती. सध्याच्या डिजीटल युगामध्ये सोशल नेटवर्किंग साइटवर आपण बराच वेळ घालवतो. परंतु या सोशल नेटवर्किंग साइट्स विषयी काही गोष्टी आपल्याला माहित नसतात. जसे की इंस्टाग्राम वरून एखादा डीपी कसा डाऊनलोड करावा? तर मित्रांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया की इंस्टाग्राम वरून डीपी कसा डाऊनलोड करता येईल.

इंस्टाग्राम काय आहे? | What is the Instagram in Marathi

इंस्टाग्राम हे एक ऍप्लिकेशन असून येथे आपण आपले फोटो व व्हिडिओज आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकतो. ज्यामुळे आपल्या संपर्कातील किंवा आपण मान्यता दिलेल्या मित्रांना ते फोटोज व व्हिडीओज आपल्या अकाउंट वरती पाहता येतात. इंस्टाग्राम वरती आपण जो आपला प्रोफाइल फोटो ठरवून देतो तो फारच छोट्या आकाराचा दिसतो. परंतु तो डाउनलोड करण्याची परवानगी इंस्टाग्राम आपल्याला देत नाही.

How to Download Instagram Dp in Marathi | इंस्टाग्राम वरून Dp कसा डाऊनलोड करावा? 

इंस्टाग्राम वरून एखादा Dp डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्या मोबाईल मध्ये क्रोम किंवा इतर कोणतेही ब्राऊझर उघडायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला Instagram सर्च करावे लागेल. इंस्टाग्राम मध्ये आल्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीचा dp डाऊनलोड करायचा आहे त्याचे नाव इंस्टाग्राम सर्च बॉक्स मध्ये सर्च करा. इथे तुम्हाला त्या व्यक्तीचे युजरनेम दिसेल ते तुम्हाला कॉपी करायचे आहे.

युजरनेम कॉपी केल्यानंतर तुम्हाला परत तुमच्या मोबाईल च्या ब्राउझर मध्ये येऊन Instadp.com ही वेबसाइट सर्च करायची आहे. जो कोणता रिझल्ट तुम्हाला सर्वात आगोदर दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करा.

वेबसाईट उघडल्यावर ती तुम्हाला या प्रकारे दिसेलHow to download instagram dp marathi step 2

यानंतर तुम्हाला Profile Pictures Downloader या बटणावर क्लिक करायचे आहे. ज्यानंतर तुम्हाला खाली दिसणारे एक पेज उघडेल.How to download instagram dp marathi step 3

इथे तुम्हाला जिथे Username असे लिहलेले दिसत आहे. तिथे तुम्ही अगोदर कॉपी केलेले Username जसेच्या तसे Paste करायचे आहे. Username कॉपी केले नसल्यास अचूक username तुम्हाला इथे लिहावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला निळ्या रंगाच्या सर्च बटणावर क्लिक करायचे आहे. काही वेळाने तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे एक पेज उघडेल.How to download instagram dp marathi step 4

इथे तुम्हाला पडताळून बघायचे आहे की तुम्ही ज्या व्यक्तीचे username टाकले होते त्याचे अकाउंट अचूक दाखवत आहे का? जर दाखवत असेल तर तुम्हाला Profile बटनाच्या बाजूला दिसत असलेले, Full size हे बटण दाबावे लागेल. परंतु जर तुम्हाला ते अकाउंट दाखवत नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीचे Username परत एक वेळेस पाहू शकता व पूर्ण प्रक्रिया परत करू शकता.

तुम्ही फुलं साईज् बटणावर क्लिक केल्यानंतर काही काळाने खाली दाखवल्याप्रमाणे पेज उघडेल ज्या मध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचा DP हा पूर्ण साईझ मध्ये बघायला मिळेल. त्याखाली तुम्हाला एक डाऊनलोड चे बटन पण दिसेल ज्यावर क्लिक करून तुम्ही तो फोटो तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.How to download instagram dp marathi step 5

अशा प्रकारे तुम्ही एखाद्या व्यक्तीचा प्रोफाइल फोटो पूर्ण आकारामध्ये पाहू शकता. तसेच तो तुमच्या मोबाईल मध्ये देखील डाऊनलोड करू शकता.

Flow Chart for Download Instagram Dp  

Search User On Instagram
>>
Copy Username
>>
Search InstaDp.com
>>
Click on Profile Picture Downloader
>>
Paste Copied Username or Enter Username
>>
Click on Search
>>
Click on Full Size
>>
Download Profile Picture

तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा लेख वाचून काही मदत झाली असेल तर नक्कीच मित्रांसोबत शरे करायला विसरू नका.