Benefits of Drinking Hot water in Marathi | गरम पाणी पिण्याचे फायदे

गरम पाणी पिण्याचे फायदे | Benefits of drinking hot water in marathi
असं म्हणतात की, आरोग्यविषयक अनेक समस्यांचा इलाज फक्त पाण्यात असतो. निरोगी राहण्यासाठी डॉक्टर सुद्धा भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. शरीरात जर पाणी भरपूर प्रमाणात असेल. तर शरीरात सर्व अंगे सूचारू रूपात काम करतात. आपल्या घरातील वयस्कर व्यक्ती सुद्धा सकाळी उठून पाणी पिण्याचा सल्ला देतात. त्याचा आपल्या आरोग्याशी कसा संबंध आहे हे देखील सांगत असतात. अशा परिस्थितीत त्यांचा असा विश्वास आहे, की जर तुम्ही पिण्यासाठी थंड पाणी गरम पाण्याचे उपयोग केला तर त्याचा तुमच्या शरीरावर अनेक पटीने चांगला परिणाम होईल. तर चला जाणून घेऊया गरम पाणी पिण्याचे फायदे ( Benefits of Drinking Hot water in Marathi )

  • रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते – गरम पाणी पिण्याचे फायदे

बदलत्या वातावरणात निरोगी राहण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यावे. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते याच्या नियमित वापराने खोकला व सर्दी यांसारखे आजार आपल्यापासून दूर राहतात. घशात संसर्ग झाला असेल किंवा घसा दुखत असेल तर डॉक्टर देखील गरम पाण्याचा वापर करण्याचा सल्ला देतात.

  • वजन कमी करण्यास मदत करते

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी जिम ( Gym ) मध्ये तासनतास घाम गाळत असाल व डाएट ( Diet ) करत असाल तर या सोबत आहारामध्ये थंड पाण्याऐवजी गरम पाण्याचा ( Hot-water ) उपयोग केल्यास तुमचे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला दररोज एक ते दोन ग्लास गरम पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करावी लागेल. असे केल्याने शरीरातील हानीकारक विष बाहेर पडते व पोट भरलेले राहते. त्यामुळे विनाकारण भूक लागत नाही व वजन कमी होऊ लागते.

  • सायनसच्या समस्येवर आराम

जर तुम्हाला सायनस ची समस्या असेल आणि नाक बंद असल्यामुळे अनेक दिवसांनी त्रस्त असाल तर तुम्ही रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. यामुळे सायनस ची लक्षणे कमी होऊन खूप आराम मिळतो

  • दात दुखी वर फायदेशीर

जर तुम्ही दातदुखी व हिरड्यांमधील त्रासापासून त्रस्त असाल तर तुम्ही दररोज कोमट पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. त्यामुळे तुमचे दात निरोगी राहतील व हिरड्या यांमधील सूज कमी होईल. गरम पाणी पिताना नेहमी लक्षात ठेवा की पाणी जास्त गरम असू नये यामुळे दातांमधील इनेमल ला नुकसान होऊ शकते.

गरम पाणी पिण्याचे फायदे | Benefits of Drinking Hot water in Marathi

  • पाचन तंत्रात मदत करते गरम पाणी पिण्याचे फायदे

जर तुम्हाला बद्धकोष्ठता व अपचनाची जुनी समस्या असेल. तर तुम्ही नक्कीच तुमच्या आहारामध्ये कोमट पाण्याचा समावेश केला पाहिजे. आठवडाभर याचा वापर करून तुम्ही फरक पाहू शकता.
1Mg नुसार गरम पाणी पिल्यामुळे रक्तवाहिन्या विरघळतात व त्यांमधील रक्त प्रवाह वाढतो ज्यामुळे पाचन तंत्र चांगले काम करते तसेच गरम पाणी पिल्याने आंबटपणाजी समस्या देखील येत नाही.

  • डिटॉक्स प्रक्रियेत मदत करते

गरम पाणी पिल्याने शरीराचे तापमान वाढते आणि जास्त घाम येतो. घामाद्वारे शरीरातील हानीकारक पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात.
जर कोमट पाण्यात, लिंबू किंवा ग्रीन टी मिक्स करून पिल्यास शरीरातील हानीकारक पदार्थ ( Toxins ) सहजतेने शरीराबाहेर काढले जातात.

  • वेदना व सूज यावर आराम

तुम्हाला पोटदुखी डोकेदुखी किंवा शरीराच्या कोणत्याही स्नायूंमध्ये वेदना होत असल्यास.
कोमट पाण्याचा वापर केल्याने या वेदना कमी होतात तसेच स्नायूंच्या सुजेवर सुद्धा आराम मिळतो.

  • मासिक पाळीच्या वेदना पासून आराम

जर तुम्हाला दर महिन्याला होणाऱ्या पिरियड मध्ये वेदना होत असतील, तर कोमट पाण्याच्या मदतीने यावर आराम मिळवता येतो.
मासिक पाळीमध्ये चहाप्रमाणे दर काही तासांनी कोमट पाणी पिल्यास पोट संकुचित होण्यास मदत होते व cramp वर आराम मिळतो.

  • कब्जपासून आराम

जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याची सवय लावल्यास. बद्धकोष्ठते पासून सहज मुक्त होता येते. एवढेच नाही तर यामुळे आतड्यांची हालचाल करण्याची प्रक्रिया देखील सुलभ होते.
म्हणून जर तुम्ही सकाळी चहा कॉफी ऐवजी गरम पाण्याचे सेवन केले तर ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.
Disclaimer : वरील सर्व माहिती ही सर्व साधारण माहितीवर अवलंबून आहे. Marathimulga.com याची पुष्टी करत नाही तरी लागू करण्यापूर्वी तज्ञांशी संपर्क साधा.

हे देखील वाचा

चिया सिड्स फायदे | Chia seeds in Marathi

तुम्हाला आमची गरम पाणी पिण्याचे फायदे or Benefits of Drinking Hot water in Marathi हि पोस्ट कशी वाटली नक्की कंमेंट मध्ये सांगा

our other domains marathigk.live