Good thoughts in Marathi about life | जीवनावर मराठी स्टेटस

 

Good thoughts in Marathi about life | जीवनावर मराठी स्टेटस या पोस्ट मध्ये तुम्हाला आयुष्यावर आधारित मराठी स्टेटस वाचायला मिळतील

 

Good thoughts about life in Marathi |जीवनावर मराठी स्टेटस

भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर, 
आपण आपला वर्तमानकाळ बिघडवत असतो. 
म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून, 
पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे.
रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा 
तो कोठे जातो, 
पण ध्येय सुंदर असेल तर मात्र 
रस्ता कसा आहे हे बघू नका, 
त्या रस्त्यावर चालत रहा.

या जगात कुणीही आपला मित्र किंवा शत्रू म्हणून जन्माला येत नाही. आपली वागणूक, आपला दृष्टीकोन आणि आपली नाती, यावर ठरते कोण आपले मित्र किंवा शत्रू.

कष्ट इतक्या शांततेत करावे की यश धिंगाणा घालेल.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना कसं करायचं त्याच्या हातात असतं.

विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल. परंतु खरा योद्धा तोच, जो पराजय होणार हे माहित असूनही, जिंकण्यासाठीच लढेल.

आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.

दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात, आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात.

स्वतःच्या हिमतीवर मेहनत करून जगण्यात जी मजा आहे ती इतर कशातच नाही.

यश कधीच सावलीत मिळत नसते त्याची पूर्ण किंमत द्यावीच लागते.

रात्र नाही स्वप्नं बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, पण वेळ नक्कीच बदलते.

अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल हसण्यामगील दुःख, रागवण्या मागील प्रेम, आणि शांत रहाण्यामागील कारण.

महिलांचे शिक्षण आणि सर्वांगिण उन्नतीसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या महान समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम !


तुम्ही वचत आहात Good thoughts in Marathi about life | जीवनावर मराठी स्टेटस

Good thoughts in Marathi about life | जीवनावर मराठी स्टेटस
हे देखील वाचा

Motivational Quotes in English


आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न 
पूर्ण करण्यासाठी काम करा,
नाहीतर दुसरा कोणीतरी
तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी
कामाला ठेवेल.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस शिकवण देतात.

काय करायचे आहे हे ठरवणे जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच काय करायचे नाही हे ठरवणे सुद्धा महत्वाचे आहे.

असं काम करा की, नाव होऊन जाईल. नाही तर, असं नाव करा की, लगेच काम होऊन जाईल.

भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर, आपण आपला वर्तमानकाळ बिघडवत असतो. म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून, पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे.

चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो. आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास, म्हणून निर्णय बरोबर कि चूक याचा जास्त विचार करायचा नाही, निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं.

आयुष्यात एकदा तरी, “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय, “चांगल्या” दिवसांची किंमत कळत नाही.

आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं.

आयुष्यातील सर्वात सोपा नियमः जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते, ते इतरांसोबत करू नका.

किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावं ते हासून-खेळून, कारण या जगात उद्या काय होईल, ते कुणालाच माहित नसते.

प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे, जे आपल्याशी वाईट वागतात, त्यांच्याशीही प्रेमानेच वागले पाहिजे, ते चांगले आहेत म्हणून नाही, तर आपण चांगले आहोत म्हणून.

मित्रांनो तुम्हाला आमची पोस्ट Good thoughts in Marathi about life | जीवनावर मराठी स्टेटस कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा