Top 11 Instagram Marathi Pages

आजच्या इंटरनेट युगात सर्वांना सोशल मीडिया च वेड लागलं आहे. त्यात इंस्टाग्राम हे तरुण मुलामुलींचे एक आवडते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनले आहे. तर चला आज जाणून घेऊया Top 11 Instagram Marathi Pages 

Tmtinstaofficial – Terrible Marathi Tales ( 858k )

Tmtinstaofficial या पेज ची सुरुवात 14 एप्रिल 2018 रोजी झाली होती. Marathi Memes & Marathi Tales या विषयावर इथे आपणास पोस्ट पहावयास मिळतात. मराठीतील सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या या पेज वरील पोस्ट ला 50000-1,20,000 दरम्यान लाईक्स मिळतात. दैनंदिन जीवनातील Relatable पोस्ट्स मुळे कमी कालावधीत या पेजने खूप लोकप्रियता मिळवली.

Viralinmaharashta ( 1M )

इंस्टाग्राम वरील 1M followers पूर्ण करणारे हे पहिले मराठी पेज आहे. या पेज ची सुरुवात 30 ऑगस्ट 2016 रोजी करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात या पेज चे नाव vishvasnangarepatil असे होते परंतु नंतर ते बदलून सध्याचे नाव देण्यात आले. यामुळे या पेज वर लाईक्स कमी बघायला मिळतात.

Marathi_status_ ( 854k )

11 मे 2016 रोजी सुरू करण्यात आलेले मराठी स्टेटस हे पेज मराठीतील विविध प्रकारचे स्टेटस यासाठी प्रसिद्ध आहे. इथे आपल्याला प्रेम, भावना, नाती यासारख्या विषयावर पोस्ट बघायला मिळतात. सध्या या Marathi Page चे 8 लाखांपेक्षा जास्त Followers आहेत.

Maharashtra_Business ( 528k )

महाराष्ट्रातील सर्वात मोठं मराठी बिझनेस पेज अशी या पेजची ओळख आहे. 17 नोव्हेंबर 2017 रोजी या Instagram Marathi Page ची सुरुवात करण्यात आली होती. उद्योजकता तसेच  Marathi Motivation या प्रकारातील हे पेज असून admin चे नाव अमित असे आहे.

Beingmarathi ( 651k )

मराठी सिनेसृष्टीतील Being मराठी हे Marathi Instagram Page आहे. या पेज ची सुरुवात 15 june 2016 रोजी करण्यात आली होती. मराठीतील नवीन कलाकारांचे फोटोज् आपल्याला या पेज वर पाहायला मिळतात.

Shivaji_maharaj_history ( 358k )

महाराष्ट्राचे दैवत मानले जाणाऱ्या छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित असलेले हे मराठी पेज 25 ऑक्टोंबर 2016 रोजी सुरू करण्यात आले होते. महाराष्ट्रातील गडकिल्ले, उत्सव, सन, संस्कृती या विषयांवरील विविध पोस्ट्स आपल्याला इथे पाहायला मिळतात.

Hebaghbhava ( 332k )

मराठी तरुण पिढीच्या मनावर राज्य करणारे हे बघ भावा हे पेज 17 सप्टेंबर 2017 रोजी सुरू करण्यात आले होते. इथे आपल्याला अनोखे मराठी जोक्स व मीम्स बघायला मिळतात.

Hebaghbhau ( 266k )

मराठी तरुणाई मध्ये hebaghbhau हे पेज सुद्धा खूप लोकप्रिय आहे. Boys या मराठी फिल्म मध्ये आपल्याला या पेजवरिल पोस्ट्स ची एक झलक बघायला मिळते. या पेज ची सुरुवात 17 डिसेंबर 2014 रोजी झाली होती. आपल्या वेगळ्या theme साठी देखील हे पेज प्रसिद्ध आहे तसेच सर्वात जुने मराठी पेज अशी देखील या पेज ची ओळख आहे.

Viral_Goshti ( 402k )

मराठीमधील फॅक्ट्स व रोचक माहितीसाठी viral goshti हे पेज प्रसिद्ध आहे. या पेजची सुरुवात 18 सप्टेंबर 2018 रोजी झाली होती. मराठी मधून माहिती देणारे असे हे पेज कमी कालावधीमध्ये लोकांच्या मनात रुजले. सध्या या पेजचे 4 लाखांपेक्षा जास्त Followers आहेत.

Premtrng ( 517k )

Love quotes या विषयावर आधारित प्रेम तरंग हे मराठी इंस्टाग्राम पेज 12 ऑक्टोंबर 2017 रोजी सुरू करण्यात आले होते. इथे आपल्याला विविध प्रकारच्या Love Status, Love Quotes बघायला मिळतात. सध्या या Marathi Instagram Page चे 5 लाखांपेक्षा जास्त Marathi Followers आहेत.

Mi_ek_singlehttp://instagram.com/mi_ek_single/ ( 307k )

या पेजची सुरुवात 28 May 2018 रोजी झाली होती. सिंगल लोकांच्या जीवनातील मजेशीर किस्से व त्यांचा दृष्टिकोन या प्रकारातील मी एक सिंगल हे पेज अनेक लोकांच्या पसंतीचे Marathi Instagram Page आहे. इथे आपल्याला एक विशिष्ट पोस्ट शैली बघायला मिळते. विशिष्ट अशा पोस्ट्स व मराठीतील जोक्स मुळे हे पेज आपल्या Top 11 Marathi Instagram Pages मध्ये एक विशिष्ट जागा मिळवते.

तर मित्रांनो तुम्हाला Top 11 Instagram Pages मध्यील माहिती कशी वाटली नक्की सांगा तसेच आपल्या Marathi Instagram Page ला देखील नक्की फॉलो करा.